स्विफ्टची टेम्पोला धडक, २ ठार


खंडाळा : पुणे - सातारा मार्गावर शिरवळ, ता. खंडाळा येथे रविवारी दुपारी स्विफ्ट डिजायर कारने टेम्पोला पाठीमागील बाजूस धडक दिल्याने झालेल्या अपघातात फलटण येथील दोन माजी नगरसेवक जागीच ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, फलटण येथील माजी नगरसेवक पी. जी . शिंदे आणि जगन्नाथ कुंभार तसेच माजी नगराध्यक्ष अण्णा देशमुख आणि चालक असे चौघे पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने स्विफ्ट डिझायर मधून चालले होते. त्यांची गाडी शिरवळ परिसरात आली असता, चालक आशिष लोंढे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

 या अपघातात अण्णा देशमुख हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना पुण्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातात दोघांचा जागीच मृत्‍यू झाला आहे.

No comments

Powered by Blogger.