Your Own Digital Platform

सातारा- कास रस्त्यावर युवकाला लुटले


सातारा : सातारा-कास रस्त्यावरील आटाळी गावच्या हद्दीत मयूर प्रकाश सावंत (वय २४, रा. लिंब ता. सातारा) या युवकाला दुचाकीवर अडवून तिघा अनोळखी युवकांनी लूटमार केली. संशयितांनी अडीच तोळे वजनाची सोन्याची साखळी यासह सव्वालाखाचा ऐवज जबरदस्तीने पळवला आहे. दरम्यान, कास रस्त्यावर ही घटना घडल्याने पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. १ सप्टेंबर रोजी तक्रादार मयूर सावंत दुपारी अडीच वाजता आटाळी गावच्या हद्दीतून येत होता. 

यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन संशयित आरोपींनी मयूरचा रस्ता अडवला व त्याला निर्जनस्थळी घेऊन गेले. तेथे संशयितांनी मारहाण करून त्याच्याकडील सोन्याची चेन, जरकीन, रोख २ हजार रुपये, मोबाईल असा १ लाख अडीच हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटला.

याबाबत तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर तीन जणांवर लुटणारीचा गुन्हा दाखल झाला आहे.