Your Own Digital Platform

विज्ञान प्रकल्प अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेमध्ये जयेश जगतापचे यश


आरडगांव : मालोजीराजे विद्यालय लोणंद ता. खंडाळा या ठीकाणी रयत विज्ञान प्रकल्प अंतर्गत वक्तृत्व स्पधेचे आयोजन केले होते. त्यामध्ये तांबवे ता. फलटण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमानशेठ गणपतराव सुर्यवंशी विद्यालयातील इ.९ वीतील विद्यार्थी कु. जयेश लक्ष्मण जगताप याने गटपातळीअंतर्गत दुसरा क्रमांक मिळविला. 

त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे तांबवे गावच्या प्रथम नागरीक सरपंच सौ. सुषमाताई शिर्दे, ऊपसरपंच विशालभाऊ शिंदे, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष, लालासाहेब शिदे, सदस्य, रमेश शिंदे, रविंद्र शिंदे, शाळेचे मार्गदर्शक राजेंद्र शिंदे, सेल टॅक्स इन्स्पेक्टर मा. सुजित बर्गे, प्रा. अरविंद जगताप, प्रा. शशिकांत जगताप, शाळेचे मुख्याध्यापक सुरेश रिटे, शाळा स्थानिक सल्लागार समिती सदस्थ, शाळा व्यवस्थापण समिती सदस्य, शाळा माजी विद्यार्थी संघ आदींनी त्याचे अभिनंदन केले