Your Own Digital Platform

चंदन चोरी करणारी टोळी गजाआड


सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयातून चार दिवसांपूर्वी चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. या चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी फलटण तालुक्यातील 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 96 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे.

नामदेव ज्ञानदेव जाधव (वय 39) यशवंत गुलाबराव जाधव ( वय 50), ज्ञानदेव गुलाबराव जाधव (वय 60), आनंदा बचाराम जाधव (वय 40), तुकाराम शंकर बनसोडे (वय 50), कुमार शिवाजी जाधव (वय 33) व नवनाथ पोपट जाधव (वय 31, सर्वजण रा. ताथवडे, ता. फलटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातून चंदन चोरी केलेले चोर हे पुसेगाव, (ता. खटाव) येथे असून ते चंदनाची विक्री करण्यास आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक प्रसन्‍न जर्‍हाड यांना कारवाईबाबत सूचना दिल्या. जर्‍हाड व त्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार संशयितांची शोधाशोध सुरू केली. 

पुसेगावातील प्रमुख असलेल्या शिवाजी चौकात 7 इसम तीन दुचाकींवर प्लास्टिक पोत्यांमध्ये असलेल्या साहित्याची राखण करीत असल्याचा संशय आला. त्यांच्याकडे कर्मचार्‍यांनी चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. या कारवाईत पोलिस उपननिरीक्षक शशिकांत मुसळे, सहायक फौजदार सुरेंद्र पानसांडे, विजय जाधव, मोहन घोरपडे, विजय शिर्के, तानाजी माने, विजय कांबळे, संतोष पवार, शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, अर्जुन शिरतोडे, विक्रम पिसाळ, मोहसीन मोमीन, मयुर देशमुख, संजय जाधव, विजय सावंत यांनी सहभाग घेतला होता.