तासगाव : पावसामुळे द्राक्षबागायतदार सुखावला


तासगाव : तासगाव तालुक्यातील पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी तासगाव शहर, मंडल, मणेराजुरी, सावळज, विसापूर,येळावी आणि मांजर्डे मंडलात दमदार पाऊस झाला. तालुक्यात १८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पाऊस परतल्याने पीक छाटणीला वेग येणार असल्याने द्राक्षबागायतदार सुखावला आहे.ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस गायब झाला होता. दीड महिने तालुक्यात पावसाचा एक थेंबही पडला नाही. मंगळवारी पाऊस परतला. दिवसभरात १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. परंतू तासगाव, मांजर्डे आणि येळावी मंडलाकडे पावसाने पाठ फिरवली होती.

बुधवारी सायंकाळनंतर तालुक्यातील पावसाचा जोर आणखी वाढला. तासगाव मंडलात २८ मिलीमीटर, मणेराजुरी मंडलात २४ मिलीमीटर, सावळज मंडलात १८ मिलीमीटर, विसापूर मंडलात १६ मिलीमीटर, येळावी मंडलात ४ मिलीमीटर तर मांजर्डे मंडलात १७ मिलीमीटर पाऊस पडला.

या पावसाचा फायदा द्राक्षबागांना होणार आहे. तालुक्यात ७ हजार ९२३ हेक्टर क्षेञावर द्राक्षबागा आहेत. आतापर्यंत केवळ १० टक्के क्षेञावरील पिकछाटणी पुर्ण झालेली आहे. पाऊस परत आल्याने महिनाभरापासून खोळंबलेल्या पिकछाटणीला वेग येणार आहे.

No comments

Powered by Blogger.