Your Own Digital Platform

वाईत तीन ग्रा.पं.तीत सत्तांतर; राष्ट्रवादीचे वर्चस्व


वाई : वाई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले असून आ. मकरंद पाटील यांचा करिष्मा पुन्हा एकदा अबाधित राहिला. मात्र पाचवडसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. येथे स्थानिक आघाडीने सरपंचपदासह 11 जागा जिंकून सत्तांतर घडवले. तालुक्यातील सहा पैकी तीन ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. शहाबाग व वेळे येथे राष्ट्रवादी काँग्रेसने तर चांदवडीत काँग्रेसने सत्ता काबीज केली.

यशवंतनगर व अमृतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम राखली.वाई तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व 49 सदस्य पदांसाठी 106 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी बुधवारी 78.37 टक्के मतदान झाले होते. गुरुवारी सकाळी दहा वाजता पंचायत समितीच्या सभागृहात तहसिलदार रमेश शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली.

पाचवड ग्रामपंचायतीत युवा नेते अजित शेवाळे व नितीन विसापुरे यांच्या नेतृत्वामुळे सत्तांतर झाले. सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीने सरपंचपदासह 11 जागा जिंकून वर्चस्व मिळवले. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली. सरपंचपदी अर्चना नितीन विसापुरे (970) यांनी बाजी मारली. 

विजयी सदस्य- अजित शंकर शेवाळे (215), वर्षा जंगम (198), तुषार सपकाळ (287), रेश्मा गायकवाड (286), संध्या गायकवाड (279), दिनेश मोरे (292), कमलाकर गायकवाड (304), मालन गायकवाड (312), संतोष गायकवाड (220), पुष्पा धर्माधिकारी (235), लता जाधव (233).

यशवंतनगर ग्रामपंचायतीतील 15 पैकी मेघा सावंत, योगेश लाखे, सुवर्णा गाडे, वैशाली गायकवाड, दिलीप मदने हे पाच सदस्य बिनविरोध निवडून आले होते. सरपंच व उर्वरित सदस्यांच्या 10 जागांसाठी सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस पँनेल व भाजपा, काँग्रेस. आरपीआय, शिवसेना पुरस्कृत यशवंतनगर बचाव पँनेल यांच्यात लढत झाली.

 यावेळी राष्ट्रवादी काँगेसने सर्व जागा जिंकून सत्ता कायम राखली. विजयी उमेदवार - सरपंच - निखिल सोनावणे (1781), सदस्य- आनंदा साठे (290), सुरेखा भिसे (389), तारावती माने (397). विजय शेंडगे (248), कोंडीबा सावंत (220). विजय भोसले (483), मेघा लोणकर (232), कुंडलिक सावंत (233), लक्ष्मी लंकेश्‍वर (342), ऋतुजा सावंत (343). शहाबाग ग्रामपंचायतीत सरपंचासह 7 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी झाल्याने सत्तांतर झाले. काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या. 

विजयी उमेदवार - सरपंच सारिका मोरे (620), सदस्य- किरणकुमार जमदाडे (175), शुभांगी जमदाडे (218), रचना ननावरे (180), रविंद्र कोरडे (266), यशवंत जमदाडे (257), संगीता राजापुरे (221), मोहन खरात (204), मंदाकिनी जमदाडे (217), दिपाली भोरे (225), वेळे ग्रामपंचायतीत सरपंचासह 8 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी झाल्याने सत्तांतर झाले. काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. विजयी उमेदवार- सरपंच रफिक इनामदार (1034), सदस्य- स्वप्ना पवार (423), स्वप्नील कांगडे (323), रोहिणी भिलारे(403), संतोष नलावडे (356), शुभांगी डेरे (356), शितल पवार (327), संतोष गायकवाड (315), रफिक इनामदार (341), सविता पवार (375). चांदवडी ग्रामपंचायतीत शांताबाई कुंभार या बिनविरोध निवडून आल्या. आज सरपंचासह उर्वरित सहा जागा जिंकून काँग्रेसने वर्चस्व मिळविले. विजयी उमेदवार- सरपंच- जयदिप शिंदे (308). सदस्य- भिकू कांबळे (74), यमुना काकडे (72), नरेश वाघ (114), सुनीता शिंदे (123), संभाजी कु-हाडे (88), नंदा शिंदे (100).

अमृतवाडीत सदस्यपदांच्या 9 जागांपैकी आरती जाधव, शशिकला सांळुखे, पूजा यादव, रुपाली शिंदे, निर्मला नलावडे या पाच महिला सदस्या बिनविरोध झाल्या होत्या. सरपंच व उर्वरित चार जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम राखली. विजयी उमेदवार- सरपंच- उषा बाबर (456), सदस्य- आनंदराव हगवणे (203), जावेद पटवेकर (168), दत्तात्रय बांदल (203), विश्‍वास निकम (152).