Your Own Digital Platform

आर्थिक आणीबाणीच्या संकटात चिरडून टाकणाऱ्या निष्ठूर सरकार विरोधात जनसंघर्ष- काँग्रेस


सांगली : काँग्रेस सरकार संघर्ष यात्रेच्या माध्यमातून भाजप सरकारवर हल्लाबोल करत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी कंबर कसली असून वेवेगळ्या माध्यमातून प्रचारास सुरवात झाली आहे. दरम्यान, कोल्हापुरातून सुरु झालेली संघर्षयात्रा सांगली जिल्ह्यात येऊन पोहचली आहे.

नोटबंदीमुळे देशाच्या जीडीपी दरात २%ची घट झाली. छोटे-मध्यम उद्योग नष्ट झाले, लाखो कष्टकऱ्यांच्या हातांचं काम एका बेजबाबदार निर्णयामुळे हिरावलं गेलं. लोकांना या भयंकर आणि अघोषित आर्थिक आणीबाणीच्या संकटात चिरडून टाकणाऱ्या निष्ठूर सरकार विरोधात आता #जनसंघर्ष काढत काढत असल्याचे काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.