पै.गुलाब मुलाणी यांचे निधन


मायणी : सलग तीन वर्षे महाराष्ट्र चँपियनशिप मिळविलेले पैलवान गुलाब दगडु मुलाणी रा.मायणी ता.खटाव यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.

त्यांनी मफतलाल मिल मुंबई यांच्यामार्फत कुस्तीस सुरुवात केली होती.पंजाब हरीयाणा,उत्तरप्रदेश,
राजस्थान यासह देशाच्या विविध राज्यामध्ये त्यांचा नावलौकिक होता.सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मायणी तालिम संघात वस्तादाचे काम करुन अनेक नामवंत कुस्ती क्षेत्रातील मल्ल तयार केले.त्यांच्या या निधनामुळे मायणी व परिसरामध्ये दु:खाचे सावट पसरलेल आहे.त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले ,एक मुलगी सुना ,नातवंडे असा परिवार आहे.

No comments

Powered by Blogger.