आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

न्यू फलटण विकत घेण्यासाठी राजेंद्र काकडे यांची एन्ट्री; १० कोटी रुपये शेतकऱ्यांना देणारफलटण : न्यू फलटण शुगर वर्क्स विकत घेण्यासाठी उद्योजक राजेंद्र काकडे पुढे आले आहेत. त्यांचा कारखान्याशी त्याप्रमाणे करारही झाला आहे. मात्र, न्यू फलटणने अद्याप पुढची प्रक्रिया पूर्ण न केल्याने शेतकऱ्यांना वाट पहावी लागेल, असे काकडे म्हणत होते. तथापी, ऊस बिल देण्यास अडचण येत होती. मात्र, शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत यावर सुवर्णमध्य काढत १० कोटी रुपयांची रक्कम येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकारी संतोष जाधव यांच्या बँक खात्यामार्फत देऊ, असे काकडे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, न्यू फलटण शुगर वर्क्स आहे या स्थितीत विकत घेणार असल्याचे सांगत कापशी (ता. फलटण) येथील उद्योगपती राजेंद्र काकडे हे आज गुरुवारी (दि. ६) रोजी तहसीलदार विजय पाटील यांच्या दालनात आले. मात्र, न्यू फलटण शुगर वर्क्सने अद्याप भागीदारीतील ७८ टक्क्यापैकी ठरल्याप्रमाणे ६८ टक्के समभाग वर्ग करण्यासाठी दिरंगाई होत असल्याचे सांगत काकडे यांनी ऊसाचे थकीत बिल देण्याची जबाबदारी झटकली आहे. यामधून शेतकऱ्यांसाठी व कामगारांसाठी फक्त १० टक्के समभाग वर्ग केल्यास व बँक ऑफ महाराष्ट्र येथील सह्यांचे अधिकार दिल्यास तातडीने ५१ कोटी रुपये आम्ही देऊ व पुढील कार्यवाही होईपर्यंत  उर्वरित रक्कम जमा करू, असे काकडे यांनी तहसीलदार पाटील यांना सांगितले होते. मात्र, त्यानंतर १० कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला.