आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा


खटाव : भाजप प्रणित युती सरकारच्या हातचे बाहुले बनलेल्या राज्यशासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी असणार्‍या खटाव तालुक्याचा समावेश नसल्याचे दिसत आहे. खटाव तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. ज्या अधिकार्‍यांच्या सांगण्यावरुन दुष्काळी तालुके जाहीर करण्यात आले आहेत त्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित करत योग्य माहिती घेऊन खटाव तालुक्यात त्वरित दुष्काळ जाहीर करा, अन्यथा मंत्र्यांना घेराव घालून जिल्हाभर तीव्र जनआंदोलन छेडू, असा इशारा आ. शशिकांत शिंदे आणि आ. जयकुमार गोरे यांनी दिला.खटाव : प्रतिनिधी

भाजप प्रणित युती सरकारच्या हातचे बाहुले बनलेल्या राज्यशासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी असणार्‍या खटाव तालुक्याचा समावेश नसल्याचे दिसत आहे. खटाव तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. ज्या अधिकार्‍यांच्या सांगण्यावरुन दुष्काळी तालुके जाहीर करण्यात आले आहेत त्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित करत योग्य माहिती घेऊन खटाव तालुक्यात त्वरित दुष्काळ जाहीर करा, अन्यथा मंत्र्यांना घेराव घालून जिल्हाभर तीव्र जनआंदोलन छेडू, असा इशारा आ. शशिकांत शिंदे आणि आ. जयकुमार गोरे यांनी दिला.