‘रयत’ला स्वतंत्र विद्यापीठाची मान्यता देणार


सातारा : रयत शिक्षण संस्थेने प्राथमिक शाळा, हायस्कूल तसेच मोठ्या प्रमाणावर कॉलेजेस उभी केली. शैक्षणिक काम करताना ‘रयत’ने गुणवत्तेवर भर दिला. त्यामुुळे आता रयत शिक्षण संस्थेचे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण झाले पाहिजे. त्या अनुषंगाने ‘रयत’चे हे स्वतंत्र विद्यापीठ करण्यास मंजुरी दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्री ना. प्रकाश जावडेकररयत शिक्षण संस्थेचा 99 वा वर्धापन दिन व शताब्दी महोत्सव सोहळा कर्मवीर समाधी परिसरात पार पडला.

 कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार होते. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दिलीप वळसे-पाटील, आ. विश्‍वजित कदम, पुणे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, टाटा टेक्नॉलॉजीचे आनंद भदे, पुणे पोस्टमास्तर जनरल कर्नल एस. एफ. एच. रिजवी, संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हा. चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, माजी चेअरमन प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी आयुक्त दिलीप बंड, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. प्रकाश जावडेकर म्हणाले, म्हणाले, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी हवा तो मार्ग उपलब्ध होवू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी शिक्षण मर्यादित ठेवले. त्यांनी आवश्यक असणारा कारकून आणि अधिकारी निर्माण करणारे शिक्षण दिले. स्वातंत्र्य आंदोलनात अनेक समाजसुधारक काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय होते. देशाला शिक्षित करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय शिक्षण दिले. लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. बापूजी साळुंखे यांनी शैक्षणिक कार्य केले. महात्मा गांधींनी कर्मवीरांच्या कार्याचे कौतुक केले. ‘कमवा व शिका’ अशा योजनांच्या माध्यमातून त्यांनी अनुभवातून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. कर्मवीरांनी जाती-धर्मविरहीत शिक्षण दिले. तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात भारतीयांनी फार काही केले नसले तरी परदेशी कंपन्यांमधील त्यांचे योगदान मोठे आहे. अटक टिकरिंग लॅबच्या माध्यमातून शाळांना 20 लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहेत. भारत बुद्धीवानांचा देश असल्याने या लॅबला वाव मिळेल. 

मद्रासमध्ये रिसर्च पार्क सुरु होत असून भारतीयांच्या नावावर पेटंट असायला हवीत. नवे शोध विद्यार्थी लावत असून उच्चतर अविष्कार योजना सुरु केली आहे. परिस्थितीशी चॅलेंज केल्याशिवाय नवे शोध लागणार नाहीत. शोधातून देश समृध्द होत असतो. हार्डवेअर सोल्युशनमध्ये अनेक शोध लागले आहेत. लवकरच ‘ऑपरेशन डिजीटल बोर्ड’ हा उपकम सुरु करण्यात येणार असून नववी ते पदवीपर्यंतच्या 20 लाख वर्गांमध्ये हे बोर्ड बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पोस्टल तिकीट व पाकिटाचे तसेच संस्थेच्या विविध उपक्रम विशेषांकाचे प्रकाशन झाले. प्रास्तविकात डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेच्या 100 वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचलन प्रा. डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. प्राचार्य सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत यांनी आभार मानले. यांनी केली.

No comments

Powered by Blogger.