पाटखळमाथा येथील जुगार अड्डा उध्वस्त; ९ जणांना अटक


सातारा : पाटखळमाथा ता. सातारा येथे रविवारी सायंकाळी सातारा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांना अटक केली. या कारवाईत रोख रकमेसह वाहने असा २ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, सातारचे नवे प्रोबेशनरी एसपी समीर शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.अरुण माने, लक्ष्मण गाढवे, सलीम सय्यद, हनुमंत कांबळे, सागर भिंगरदेवे, शब्बीर शेख, सुरज शिंदे, अमोल दुबळे, अविनाश रणदिवे (सर्व रा. पाटखळमाथा सातारा शहर परिसर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार इनयात मुल्ला यांनी तक्रार दिली आहे.

पाटखळमाथा येथे कॅनॉल येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती प्रोबेशनरी एसपी समीर शेख यांना मिळाली. पोलिसांचे पथक तयार करून त्यांनी रविवारी सायंकाळी छापा टाकला असता सर्व संशयित सापडले. यावेळी रोख 16 हजार रुपये, दुचाकी, जुगाराचे साहित्य असा 2 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

No comments

Powered by Blogger.