जिल्ह्यात आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवासाची उत्सुकता


सातारा :जिल्ह्यात आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवासाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सात दिवसांत या उत्सवाला प्रारंभ होत असून नऊ दिवस देवीचा जागर होणार आहे. नवरात्रोत्सव मंडळे तसेच देवीच्या भक्तगणांमध्ये नवरात्रोत्सवाची धांदल सुरू आहे. नवरात्रोत्सवामध्ये नवरंगांची उधळण होणार असल्याने रंगप्रेमींमध्ये विशेषत: महिला वर्गामध्ये नवरंगांच्या साड्या खरेदीची धामधूम सुरु झाली आहे.नैराश्याचे मळभ दूर करुन मांगल्याची चाहूल घेऊन येणारा नवरात्रोत्सव बुधवार दि. 10 पासून सुरु होत आहे. 

घटस्थापना करुन घरोघरी आदिशक्तीची आराधना करण्याचे मंगल पर्व म्हणजे नवरात्रोत्सवाच काळ होय. विशेषत: महिला वर्गाला या उत्सवामध्ये हौसमौज करण्यासाठी संधी मिळते. मग नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळे नऊ रंगाच्या साड्या किंवा ड्रेस वापरण्याचा महिला व युवतींचा अट्टाहासही वाढत आहे. विविध महिला मंडळे, वचत गटातील महिला नवरात्रीमधील नऊ रंगांच्यासाड्या देखील खरेदी केल्या जातात. 

नवरात्रीतील नव रंगांच्या क्रेझमुळे बाजारपेठेेतही या रंगातील कपडे खरेदीसाठी गर्दी होत असून या खरेदीमुळे नवरात्रोत्सवापूर्वीच बाजारपेठेत मोठी उलाढाल होणार आहे. या उत्सव काळातील 9 दिवस अनेक महिला व युवतीही उपवास धरत असतात. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांनाही मोठी मागणी असते. बाजारपेठेत त्यादृष्टीने उपवासाचे पदार्थ व फळेही दाखल झाले आहेत.


नवरात्रीचे नव रंग


बुधवार दि. 10 रोजी निळा

गुरुवार दि. 11 रोजी पिवळा

शुक्रवार दि. 12 रोजी हिरवा

शनिवार दि. 13 रोजी राखाडी

रविवार दि. 14 रोजी केशरी

सोमवार दि. 15 रोजी पांढरा

मंगळवार दि. 16 रोजी लाल

बुधवार दि. 17 रोजी आकाशी

गुरुवार दि. 18रोजी गुलाबीउपवासात हे टाळा

फक्त लिंबू-पाणी किंवा दूध पिऊन उपवास करणे.

आंबट फळं उदा. संत्री, लिंबू, मोसंबी खाऊ नये.

नऊ दिवस एकाच

प्रकारातील फळं खाणे.याचा करा आहारात समावेश


हाय फायबर आणि लो फॅट असणारे पदार्थ खावेत

त्वचेतील कोरडेपणा कमी करण्यासाठी द्रव पदार्थ वाढवा

सामान्य दूधाऐवजी स्किम्ड दूध प्या

मॉर्डरेट प्रोटीन, हाय कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ

सुका मेव्यासह ज्यूस, फ्रुट सॅलड, मिल्कशेक-नारळ पाणी.

No comments

Powered by Blogger.