पर्यावरणपूरक आकाशकंदील


कराड : येथील जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिरच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक आकाश कंदिल तयार करून एक अनोखा उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व नवनिर्मितीला चालना देणार्‍या या उपक्रमाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे. येथील मंगळवार पेठेतील सरस्वती विद्यामंदिरकडून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांमुळे कलागुणांसह नवनिर्मितीलाही चालना मिळते. रंगीबेरंगी कागद, पुठ्ठा आणि फेव्हिकॉल यासह अन्य साहित्याचा वापर करत विद्यार्थ्यांनी सुंदर आकाशकंदिर तयार केले आहेत.

जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले, उपाध्यक्ष तुकारामचव्हाण, सचिव अनिल कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी, स्वाती भागवत, रमेश फणसळकर यांनी या उपक्रमाबाबत मनोगत व्यक्त करताना समाधान व्यक्त केले. तर मुख्याध्यापिका विद्या घोलप यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवल्या जाणार्‍या उपक्रमांचा आढावा घेतला.

No comments

Powered by Blogger.