भाजप सरकारच्या निषेधार्थ फलटणमध्ये मोर्चा


फलटण : सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे, खो गये, खो गये, अच्छे दिन खो गये, अशा घोषणाबाजी करत आदीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.महात्मा गांधी यांना अभिवादन करून गजानन चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात अनेक नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

केंद्र व राज्य सरकारने फक्त फसव्या घोषणा करत असून सर्वसामान्य लोकांना महागाई ची झळ पोहोचत आहे. यामुळे शेतकरी, कामगार तसेच महिला वर्ग यांचे बजेट कोलमडून पडले असताना फक्त फसव्या घोषणा देण्यात मग्न आहे. केलेल्या घोषणा पूर्ण करण्यासाठी नसतातच असे त्यांचेच मंत्री सांगत असल्यामुळे या केंद्र व राज्य सरकार ला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. मोदी व फडणवीस सरकारने पाय उतार व्हावे, असे आमदार दीपक चव्हाण यांनी प्रतिपादन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विलासराव नलावडे, शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, डी. के.पवार, सभापती प्रतिभाताई धुमाळ , रेश्माताई भोसले, सुधीर अहिवळे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले.

No comments

Powered by Blogger.