सिग्नल तोडून रेल्‍वे लुटणारे तिघे सातार्‍यात जेरबंद


सातारा : सातारा, जळगाव, भुसावळ, नाशिक, सोलापूर, हैद्राबाद, गुंतकल आशा वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेचे सिग्नल तोडून गाडी थांबल्यानंतर प्रवाशांचे पैसे, सोने, मोबाईल व अन्य मौल्यवान वस्तू लुटणाऱ्या टोळीचा सातारा आरपीएफ पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईमध्ये एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे.रोहित गोरख रलेभात (वय २४) विनोद सखाराम जाधव (वय ३०) बाबू मोहन कसबे (वय २५ सर्व रा. जामखेड, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयिताकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या व त्यांच्याकडून रेल्वे सिग्नल तोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या टोळीकडून वेगवेगळ्या ठिकाणच्या रेल्वेमधील २५ ते ३० गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या टोळीने सातारा येथे रहिमतपूर, सालपे, आदर्की, पळशी, शेणोली याठिकाणी चोरी केल्याचे कबुली दिली आहे. या टोळीतील ३ ते ४ साथीदार फरार झाले आहेत.

आरपीएफचे प्रधान सुरक्षा आयुक्त ए. के. श्रीवास्तव, मुख्य सुरक्षा आलोक बोहरा, वरिष्ठ सुरक्षा आयुक्त पुणे डी. विकास, सह. सु. आ. मकरारिया यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अजय एन. संसारे, हवालदार शहाजी जगताप, कॉं. विजय पाटील कॉ. पंकज डेरे यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.

No comments

Powered by Blogger.