संदिप त्रिंबके विज्ञान प्रेमी शिक्षक पुरस्काराने सन्मानित


मायणी : मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ, मायणीेचे भूतेश्वर विद्या मंदिर , अंबवडे (ता.खटाव) येथील शिक्षक संदीप त्रिंबके यांना सातारा जिल्हा विज्ञान शिक्षक संघामार्फत विज्ञान प्रेमी शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सातारा जिल्हा विज्ञान शिक्षक संघामार्फत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात येतो. संदिप त्रिंबके यांनी नवनवीन उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सातत्य ठेवून जिल्हा व राज्य स्तरावर आपल्या निबंध लेखनाची , नवोपक्रमाची ,कृतीसंशोधनाची छाप टाकली आहे. विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन यश मिळवणारे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थांना सहभागी होण्यासाठी आजपर्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे.

अनंत इंग्लिश स्कूल सातारा येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सौ.मुजावर मॅडम (उपशिक्षणाधिकारी माध्यमिक )यांच्या हस्ते संदीप त्रिंबके यांना सन्मानपत्र व गौरवचिन्ह देऊन विज्ञान प्रेमी शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

यावेळी सातारा जिल्हा विज्ञान शिक्षक संघाचे अध्यक्ष विठ्ठल सजागाणे , सचिव उमेश खोले ,संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे ,सचिव सुधाकर कुबेर ,सर्व संचालक, मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.