उदयनराजेंकडे पहात पवार म्हणाले, 'मला तर इथे एकच पैलवान दिसतोय'


सातारा : सातारा शासकीय विश्रामग्रहावर आज शरद पवार लोकांशी बोलत होते, तेव्हा खासदार उदयनराजे व काही पैलवान शरद पवार यांना भेटायला आले. भेटून निघताना त्यातील एकजण म्हणाला साहेब पैलवानांना तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे, तेव्हा पवार म्हणाले, कुठे आहेत पैलवान ? मला तर तुमच्यात एकही पैलवान दिसत नाही. 

उदयनराजे यांच्याकडे हात करत मला इथं एकच पैलवान दिसतोय असे पवार म्हणताच जोरदार हशा पिकला.सातारा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उदयनराजे हाच पक्षाचा पैलवान असेल असेच तर पवारांना सुचवायचे नव्हते ना, अशी ही चर्चा सुरू झाली.

No comments

Powered by Blogger.