सावकारीप्रकरणी कराडातील एकावर गुन्हा


कराड : खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून टेन्शन आलेल्या एकाने तापाच्या गोळ्या खात पित्ताचे औषध पिल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी (दि. 2) रात्री हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कराडमधील एकावर शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अब्दुल दस्तगीर मुजावर (वय 36, रा. व्यंकटेश प्लाझा, मलकापूर, ता. कराड) यांच्यावर वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून असिफ मुलाणी (पूर्ण नाव माहीत नाही, रा. मुजावर कॉलनी, कराड) याच्यावर खासगी सावकारीप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, अब्दुल मुजावर हा मलकापूर येथे कुटुंबासह राहतो. तो गेल्या अनेक वर्षांपासून गॅरेज चालवत असून, त्याचे वडील, भाऊ हे ट्रक दुरुस्तीचा व्यवसाय करतात. तसेच सुमारे दोन वर्षांपासून अब्दुल मुजावर हे जुन्या कार खरेदी-विक्रीचा व्यवसायही करतात. त्यांची मुजावर कॉलनी येथील असिफ मुलाणी याच्याशी ओळख झाली होती. ओळखीतून असिफ मुलाणी याच्याकडून अब्दुल मुजावर यांनी 2017 मध्ये 1 लाख रुपये व्याजाने घेतले होते. मुलाणी याने त्यावेळी कोर्‍या स्टॅम्पवर अब्दुल मुजावर यांच्या सह्या घेतल्या होत्या.

त्यानंतर जानेवारी 2018 मध्ये अब्दुल मुजावर यांनी मुलाणीला 70 हजार रूपये दिले. मात्र 70 हजार रूपये व्याजात जमा करतो असे सांगून मुलाणी याने पुन्हा अब्दुल मुजावर यांच्याकडे 1 लाख रूपयांची मागणी करू लागला. पैशासाठी वारंवार फोन करून धमक्या देऊ लागला.

त्याच्या धमक्यांमुळे टेन्शन आल्याने अब्दुल मुजावर यांनी 1 आक्टोंबर रोजी घरात असलेल्या तापावरच्या व पित्तावरच्या चार गोळ्या खालल्या तसेच दोन औषधाच्या बाटल्या एकदम पिल्या. त्यामुळे मुजावर यांना अस्वस्त वाटू लागले व चक्कर आल्याने त्यांना उपचारासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी मुजावर याची विचारपूस करून खासगी सावकारी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार असिफ मुलाणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास गायकवाड करत आहेत.

असिफ मुलाणी याने लावलेल्या तगाद्याला कंटाळून अब्दुल मुजावर यांनी कराड सोडून बेळगाव गाठले. तेथे त्यांनी कार चालवून काही रक्कम जमा केली. ती जमा झालेली रक्कम व पाहुण्यांकडून घेतलेली काही रक्कम असे 40 हजार रुपये घेऊन अब्दुल मुजावर कराडला आले. त्यांनी ते 40 हजार रुपये मुलाणी याला दिले. त्यानंतरही मुलाणी हा प्रत्यक्ष भेटून व फोनवरून 1 लाख रुपयांसाठी मुजावर यांना धमक्या देत होता.

No comments

Powered by Blogger.