‘स्टार’ विमानसेवा बेळगावातून?बेळगाव : सांबरा विमानतळावरून येत्या काळात स्टार विमानसेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्टार स्काय कंपनीने सांबरा विमानतळावर कार्यालय आणि तिकीट नोंदणी काऊंटर उभारणीच्या कामाला सुरूवात केली आहे. यामुळे येत्या काळात प्रवाशांना स्काय विमानसेवेचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.उद्योगपती संजय घोडावत यांच्या मालकीची स्टार स्काय कंपनी विमानसेवा क्षेत्रात कार्यरत झाली आहे. त्यांच्याकडे सध्या दोन विमाने असून यामध्ये 50 प्रवासी बसण्याची क्षमता आहे. 

स्टार स्कायने सांबरा विमानतळावर कार्यालय आणि काऊंटर उभारणीला कामाला सुरूवात केली आहे. परंतु, बेळगावातून कधी विमानसेवा सुरू होणार आहे, याबाबत निश्‍चित माहिती उपलब्ध नाही. कंपनीच्या वेबसाईटवर आगामी काळात बेळगावसह हुबळी, पुणे, बंगळूर, तिरुपती, त्रिवेंद्रम प्रवासाची तिकीट नोंदणी सुरू करण्याचे नोंदविले आहे.

उड्डाण योजनेतून स्टार स्काय कंपनीला हुबळी-पुणे, हुबळी-पुणे, हुबळी-तिरुपती या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र विमानसेवा कधी सुरू होणार याबाबत अनिश्‍चितता आहे. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेच्या तिसर्‍या टप्प्यात बेळगावचा समावेश होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत विमानसेवा सुरू होण्यास प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

No comments

Powered by Blogger.