सातारा : पाटण - तारळेत आठ घरांसह ग्रामपंचायत कार्यालयात चोरी


तारळे : तारळे (ता. पाटण, जि. सातारा) परिसरातील चार गावातील आठ घरांसह बांबवडे गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात गुरूवारी रात्री चोरी झाल्याचा धक्कादायक प्र्रकार समोर आला आहे. बांबवडे ग्रामपंचायत कार्यालयातून रोख रक्कम चोरीस गेली असून याप्रकरणी गुन्हे नोंद करण्याची कार्यवाही सुरू असल्याने अधिक तशपील उपलब्ध होऊ शकलेला नाही.

तारळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. गुरूवारी रात्री तारळे परिसरातील ढेरोशी येथील चार घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. ही चारही घरे बंद होती. त्यामुळे या घरातून किती मुद्दमाल चोरट्यांनी लंपास केला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्याचबरोबर बांबवडे गावात दोन घरांसह ग्रामपंचायत कार्यालयात चोरी झाली आहे. याशिवाय आवर्डे आणि आबंळे या दोन्ही गावात प्रत्येकी एका घरात चोरी करण्यात आली आहे. या नऊ ठिकाणी झालेल्या चोरीची माहिती घेण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू असून दुपारपर्यंत चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच ऐवज याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

No comments

Powered by Blogger.