फलटणच्या वैष्णवीचे राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत यश


फलटण : उस्मानाबाद येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत फलटण येथील वैष्णवी महेश साळुंखे हिने १९ वर्षा खालील वयोगटात उत्तम यश पटकावले आहे. वैष्णवी फलटण येथील शिवाजीराजे इंग्लिश मिडियम सीबीएसईची माजी विद्यार्थिनी असून, इयत्ता दहावी मध्ये ८५ टक्के गुण मिळूनही आर्चरी खेळासाठी तिने कला शाखेत प्रवेश घेतला आहे. वैष्णवी सध्या एस. पी. कॉलेज पुणे येथे बारावीत शिकत आहे.
         
वैष्णवीची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात झाली असून, दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत वैष्णवी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. कंपाउंड राउंड प्रकारात वैष्णवीने मिळवलेले यश फलटण मधील शालेय खेळाडूंसाठी प्रेरणादायक आहे.  त्यामुळे फलटणमध्ये तिचे विशेष कौतुक होत आहे.

No comments

Powered by Blogger.