ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


वडूज : वडूज-बनपुरी मार्गावर ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार अमोल आंनदा माने (रा. वर्धनगड) हे जागीच ठार झाले. या अपघाताची वडूज पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

करमारवाडीच्या हद्दीत ट्रॅक्टर चालक हरिश शरद पाटोळे हे ट्रॅक्टर (एम.एच 11 बी.ए 8592) भरधाव वेगाने चालवत होते. दरम्यान, अमोल माने हे मोटारसायकल (एम.एच04 सी.आर 6461) वरून जात असताना ट्रॅक्टर व मोटारसायकलची धडक झाली. या धडकेत अमोल माने यांचा जागीच मृत्यू झाला. वडूज पोलिस ठाण्यात श्रीकांत माने यांनी ट्रॅक्टरचालक हरिश पाटोळे व ट्रॅक्टरमालक वैभव साळुंखे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

No comments

Powered by Blogger.