बॉम्बची अफवा; पोलिसांची धावपळ


सातारा : पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील अजंठा चौकातील उड्डाणपूल नाजिक २ बेवारस बॉक्स मध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली. यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. यदाकदाचित बॉम्ब असला तर मोठी दुर्घटना होऊ नये. यासाठी पोलिसांनी सातारा रहिमतपूर हा रस्ता तब्बल अर्धा तास रोखून धरला होता. यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

 या बॉक्समध्ये नेमकं काय आहे याची तपासणी करण्यासाठी बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी या बॉक्सची तपासणी केली असता, या बॉक्समध्ये हॉटेलसाठी लागणाऱ्या भाज्या असल्याचे आढळून आले.बुधवारी दुपारी 12:30 च्या दरम्यान पोलिसांना एक निनावी फोन आला. यामधून अजंटा चौकातील उड्डाण पुला नजीक दोन बेवारस बॉक्स असून, त्यामध्ये बॉम्ब असल्याचे सांगण्यात आले.

 ही माहिती समजल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बॉम्‍बमुळे कोणाला धोका पोहचू नये यासाठी सातारा ते रहिमतपुर हा रस्ता रोखून धरला. यानंतर बॉंम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. बॉम्बशोधक पथकाने यावेळी संबंधीत बॉक्‍सची तपासणी केली असता, बॉक्समध्ये भाज्‍या असल्याचे आढळून आले. त्या बॉक्समध्ये भाज्‍या असल्याचे आढळल्यानंतर पोलिस व बॉम्बशोधक पथकाने सुटकेचा निश्वास टाकला.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तसेच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती सातारा ते रामपूर हा रस्ता अर्धा तास बंद केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

No comments

Powered by Blogger.