गांधी जयंतीदिनी राष्ट्रवादीचे मौन धारण करून धरणे आंदोलन


फलटण : सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसात महागाई कमी करू, दोन कोटी नोकऱ्या देऊ अशा एक ना अनेक केंद्र सरकार व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक, सामाजिक, परिस्थिती खालावली आहे. तसेच भारतात व महाराष्ट्रात महिला व मुलींवर सर्वात जास्त अत्याचार झाले आहे. राज्यातील ३ हजारहून अधिक महिला व मुली बेपत्ता आहेत. 

यामुळे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्याचा बोजवारा उडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिला भीतीच्या छायेत आहेत. यासाठी भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी गजानन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मौन धारण करुन धरणे आंदोलन करण्यात आले.

भाजपच्या प्रतिगामी धोरणामुळे महात्मा गांधीजींनी आणि स्वातंत्र्यवीरांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य, लोकशाही, व संविधानीक सार्वभौमत्व धोक्यात आलेले आहे. भारतीय लोकशाही अबाधित रहावी यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्यासह विविध महिला, युवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.