वेळे येथे हॉटेल आशीर्वादवर छापा; दारू विक्रेत्यास अटक


ओझर्डे : वाईचे डीवायएसपी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने वेळे येथील हॉटेल आशीर्वादवर छापा टाकून 8762 रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या 62 बाटल्या व 360 रुपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणी दारू विक्रेता संजय शामराव साळुंखे यास अटक करण्यात आली. हॉटेल आशीर्वादमध्ये देशी-विदेशी दारूची विक्री राजरोसपणे विनापरवाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना खबर्‍यामार्फत मिळाली होती. 

यावरून पथकातील पोलिस हवालदार श्रीनिवास बिराजदार, प्रशांत ठोंबरे यांनी छापा टाकला असता तेथे विनापरवाना दारू विक्री होत होती. हॉटेलमधून 8762 रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या 62 बाटल्या, 360 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. येथे दारू विक्री करणारा संजय शामराव साळुंखे (वय 45, रा. वेळे) यास ताब्यात घेऊन त्याच्यावर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

No comments

Powered by Blogger.