सालपे येथे वृध्देचा निर्घृण खून


लोणंद : सालपे तालुका फलटण येथील शांताबाई जयवंत खरात ( वय,७० ) या वृद्धा सोमवारी पहाटे लघुशंकेला घराबाहेर आल्या असताना त्यांचा अज्ञातांनी धारदार शस्रांनी पाठीवर वार करून निघृन खून केल्याची घटना घडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. या वृद्ध महिलेचा खून कोणत्या कारणासाठी केला असावा याचा पोलिस तपास घेत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्‍ज्ञांना पाचारण केले आहे.सालपे येथील गावामध्ये संतोष जयवंत खरात हे आपले आई -वडिल, कुटुंबासमवेत रहातात. वयोवृध्द असणाऱ्या शांताबाई पहाटे ४ च्या सुमारास घराबाहेर लघुशंके करता गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने पाठीवर वार करुन खून केला.

बराचवेळ त्या घरात आल्या नाहीत. म्हणून त्यांचे पती जयवंत खरात हे बाहेर आले असता त्यांना शांताबाई रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी आरडा- ओरडा केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. त्यांच्या पाठीवर धारदार शस्त्राचे वार दिसुन आले. त्यामुळे खुनाची शक्यता व्यकत केली. त्यांना तातडीने लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्यांचा मृत्यू झाला होता.

याबाबत लोणंद पोलिसांना माहिती देताच साहाय्‍यक पोलिस निरिक्षक गिरिश दिघावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वृध्देच्या पाठीवरील धारदार शस्त्राचे वार पहाता खुनाचा प्रकार दिसून आले आहेत. घटनास्थळी पोलिस उपअधिक्षक डॉ. अभिजीत पाटील यांनी भेट दिली. याबाबत लोणंद पोलिसांनी पंचनामा केला असुन पुढील तपास सपोनि गिरिश दिघावकर करत आहेत.

No comments

Powered by Blogger.