लखनौ येथील आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेसाठी एनकूळ हायस्कूलची निवड


मायणी : आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत लखनौ येथे दि. ५ ते८ ऑक्टोबर आयोजित आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेसाठी खटाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी शिंदे विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या पाच विद्यार्थीनी व एका शिक्षिकेची निवड खा. शरदचंद्र पवार यांनी केली असल्याची माहिती प्राचार्य सावंत यांनी दिली.

या परिषदेमध्ये पोस्टर व्दारा आपल्या गावची सर्व साधारण माहिती, शैक्षणिक माहिती, गावातील उपलब्ध सुविधा व अपेक्षित सुविधांबद्दल हिंदी व इंग्रजीमधून माहिती दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या राज्यातील सांस्कृतिक परंपरा देखील सादर करण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यातून केवळ दोनच माध्यमिक विद्यालयांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थिनी व शिक्षिका - कु. ऋतूजा मालोजी फडतरे, कु. स्नेहल सुभाष ओंबासे, कु. सलोनि संजय चौगुले, कु. काजल राजेंद्र फडतरे, कु.रिया सर्जेराव फडतरे, सौ. रंजना संजय राजमानेत (शिक्षिका).

या सर्वांना विद्यालयात खास समारंभ आयोजित करुन निरोप व शुभेच्छा देण्यात आल्या. सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार प्रकाश सुरमुख उपस्थित होते.विद्यालयातील जेष्ठ शिक्षक एम.एन. निकम अध्यक्षस्थानी होते. त्याचप्रमाणे शालेय विकास समितीचे अध्यक्ष विकास खरमाटे ,निवडपात्र विद्यार्थाचे पालक विद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब खाडे यांनी केले. यावेळी निवड पात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी, सौ. राजमाने यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

No comments

Powered by Blogger.