‘स्वाईन’ने बोरगावच्या एकाचा मृत्यू


वेणेगाव : सातारा तालुक्यातील बोरगाव येथील राकेश आबासो साळुंखे (वय 31) यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. या घटनेने बोरगावसह परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. राकेश यांनी दि.13 रोजी बोरगाव येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतले होते.

अधिक उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले असताना त्यांना दि. 22 रोजी पुणे येथील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार घेत असताना रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राकेश यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. एनआयव्हीच्या वैद्यकीय अहवालात राकेश यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांनी सांगितले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

No comments

Powered by Blogger.