कोरेगाव येथे ९ मटकाबुकींना अटक, ११ लाखाचा मुद्देमाल जप्त


कोरेगाव : कोरेगाव येथे आवैध मटका अड्यावर डीवायएसपी प्रेरणा कट्टे यांनी टाकलेल्या छाप्यात नऊ मटका बुकींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १० लाख ५६ हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन एकजण फरार झाला.कोरेगाव कृष्णनगर कॉलनी येथे बंदिस्त घरात शहर व परीसरात मटका घेणाऱ्या दहा मटकाबुकी दिवसभरात मटका घेतलेली रक्कम मोजत असल्याची खबर कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांना मिळाली. 

त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक व्ही. बी. जगदाळे, पो. ना. एस. डी. नाळे, पो. काँ. महेश पवार, पो. काँ. विनोद पवार अशा केवळ चौघां जणांना तात्काळ कोरेगावात बोलावून घेतले. या सहकाऱ्यांच्या साहाय्याने छापा टाकला. यावेळी दहा मटका बुकी हजर होते. मात्र छाप्याची माहिती मिळताच सावध झालेला एक संशयीत फरार झाला. या कारवाईत मटकाबुकी शाहरुख काझीसह अन्य आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत रोख ९ लाख ३२ हजार आणि १ लाख २४ हजार रुपयांच्या दुचाकी आणि मोबाईल जप्त केले आहेत. यामध्ये ११ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार बुकिस अटक तपास पथक रवाना झाले आहे.

शाहरुख हजरत काझी, रियाज पीर महम्मद काझी, अनिल रज्जाक शेख, आरबाज अशपाक शेख, सलीम हजरत काझी, मंगेश हिंदुराव मदने, मनोज किसन पार्टे, सुनिल अनिल बोतालजी, राहुल किसन पार्टे या नऊ जणांना अटक केली असून उमेश ननावरे व संतोष मल्हारी भंडलकर फरार झाले आहेत.

कोरेगाव शहर व परीसरांतील मटकाबुकींची एका वेळी एका ठिकाणी एवढया मोठ्या संख्येने पकडण्याची किमया प्रथमच डीवायएसपी प्रेरणा कट्टे यांनी केले. तेही रहिमतपूर पोलिसांच्या मदतीने केल्याने कोरेगाव पोलिस निरीक्षक दादासो चुडाप्पा यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.

No comments

Powered by Blogger.