कराड शहरावर सीसीटीव्हीचा वॉच


कराड : कराड शहरातील विविध ठिकाणी व कराड नगरपारिषदेच्या विविध मिळकतीमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्याबाबतचे इस्टिमेट तयार करण्यात आले असून लवकरच वर्कऑर्डर काढण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे 42 लाख 10 हजार 405 रूपये इतका खर्च अपेक्षित आहे.कराड शहर व परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना म्हणून शहरातील विविध ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे.

 शहरातील कृष्णा नाका, विजयदिवस चौक, स्व. वेणूताई उपजिल्हा रूग्णालय, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा चौक, भेदा चौक, कोल्हापूर नाका परिसर, बसस्थानक परिसर, आझाद चौक, इदगाह मैदान परिसर, बैलबाजार रोड, शिवाजी स्टेडियम परिसर, जोतीबा मंदिर परिसर, टाऊन हॉल परिसर, दैत्यनिवारणी मंदिर चौक, बैलबाजार रोड, सुमंगलनगर, पोस्टल कॉलनी, त्रिमूर्ती कॉलनी चौका याशिवाय इतर एकूण 121 ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

त्यासाठी कराड शहरामधील चावडी चौक पासून जोतीबा मंदिर परिसर करीता 3 लाख 11 हजार 350, कृष्णा नाका ते कॉटेज हॉस्पिटल परिसर करिता 4 लाख 84 हजार 916 रूपये, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम व वाखाण रोड परिसर करिता 4 लाख 37 हजार 736 रू. आझाद चौक व दत्त चौक परिसर करिता 4 लाख 6 हजार 700 रू. कराड नगरपरिषद समोरील व टाऊन हॉल परिसर करिता 4 लाख 95 हजार 336 रू, कोल्हापूर नाका परिसर करिता 4 लाख 99 हजार 80 रू. कराड पोलिस स्टेशन परिसर करिता 4 लाख 495 रू., भेदा चौक पासून कार्वे नाका परिसर करिता 4 लाख 93 हजार 845 रूपये.इतका खर्च करण्यात येणार आहे.

सीसीटिव्ही कॅमेरे बसवणे करिता सध्या अस्तित्वात असलेली नेटवकिर्र्ग केबलचा उपयोग करण्यात येणार आहे. ज्याठिकाणी केबल उपलब्ध नसेल त्याठिकाणी नव्याने केबल ओढण्यात येणार आहे. ज्याठिकाणी केबल उपलब्ध नसेल त्याठिकाणी नव्याने केबल जोडण्यात येणार आहे. त्यासाठी 4 लाख 95 हजार 950 इतका खर्च अपेक्षित आहे. एकूण 42 लाख 10 हजार 405 रूपये इतका खर्च अपेक्षित आहे.

तसेच ड्रेनेज पंपींग स्टेशन, एसटीपी परिसर, जलशुध्दीकरण केंद्र याठिकाणीही सीसीटिव्ही बसवण्यात येणार आहे.

No comments

Powered by Blogger.