खतांच्या दरवाढीविरोधात बळीराजाचे आंदोलन


कराड : केंद्र सरकार व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे खतांच्या किमतीत सुमारे २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. अगोदरच शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. आता या दरवाढीमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची का ? असा संतप्त प्रश्न उपस्थित करत बळीराजा शेतकरी संघटनेने कराड तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी जोरदार निदर्शने केलीयावेळी कराड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे तसेच खताचे पोते, जाळण्याचा प्रयत्न केला. 

मात्र पोलिसांनी हा प्रयत्न निष्फळ ठरवत प्रतिकात्मक पुतळा व खताचे पोते ताब्यात घेतले. त्यानंतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. तसेच तहसीलदार यांना निवेदन देत भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्यासह बळीराजाचे पदाधिकारी व शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

No comments

Powered by Blogger.