आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

शाहूनगर परिसरात बिबट्याचा वावर


शाहूपुरी : शाहूनगर मंगळाईदेवी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याने कुत्र्याच्या दोन पिल्लांचा फडशा पाडल्याची घटना सीसीटीव्‍हीत कैद झाली आहे.शाहूनगर परिसरात अनेक वेळा बिबट्याने दर्शन दिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने मंगळाई देवी मंदीर परीसरात तळ ठोकून असल्याने नागरीक भितीच्या छायेत वावरत आहेत.

दि. ९ रोजी रात्री दिड वाजता परिसरात राहणाऱ्या कानेटकर यांच्या बंगल्या समोर बिबट्या फिरत असताना एका कुत्र्याच्या पिल्लावर डल्ला मारला. तसेच दि.१० रोजी बिबट्याने आणखी एका पिल्लाला उचलून नेले. हि संपूर्ण घटना सीसीटीव्‍हीत कैद झाली आहे. या घटनेची माहिती वनविभागाला समजल्यानंतर वनक्षेत्रपाल सुहास भोसले व पडवळकर यांनी सहकार्या समवेत घटनास्थळी भेट दिली.

बट्याचा बंदोबस्त लवकरात- लवकर करावा अशी मागणी नागरिकांमधून होवू लागली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.