दोन शेतकर्‍यांची आत्महत्या


वडूज : खटाव तालुक्यातील त्रिमली व उंबर्डे येथील दोन शेतकर्‍यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. कुंडलिक बाबूराव पवार (वय 65, रा. उंबर्डे) आणि शिवाजी पांडुरंग येवले (वय 35, रा. त्रिमली) अशी दोघांची नावे आहेत. उंबर्डे, ता. खटाव येथील कुंडलिक बाबुराव पवार (वय 65) या शेतकर्‍याने सोसायटी, हातउसने घेतलेले पैसे, शेतीच्या पिकाचे झालेले नुकसान या नैराश्यातून कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. कुंडलिक पवार यांनी शेती व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. 

मात्र, त्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे ते चिंतेत होते. सोमवारी सकाळी ते कोणासही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यानंतर त्यांची नातेवाईकांनी शोधाशोध केल्यावर ते एका ठिकाणी झोपल्याचे दिसून आले. त्यांना ग्रामीण रूग्णालयात नेले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

याबाबतची फिर्याद संदीप कुंडलिक पवार यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली आहे.त्रिमली ता. खटाव येथील शेतकरी विकास सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन शिवाजी पांडुरंग येवले (वय 35) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवाजी येवले यांनी 3 लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, त्याची परतफेड करता येत नसल्याने आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments

Powered by Blogger.