Your Own Digital Platform

एसटी चालकाला युवकांची फिल्मी स्टाईलने मारहाण


सातारा : पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरालगत शेंद्रे गावच्या हद्दीत जमखंडीहुन मुंबईला जाणाऱ्या बस चालकाला दुचाकी गाडी आडवी मारुन पट्ट्याने बेदम मारहाण झाली. फिल्मी स्टाईलने झालेल्या मारहानीमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, दोन युवकांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सोमवारी दुपारी जमखिंडी- मुंबई या एसटीला ओव्हरटेक करण्याच्या कारणावरुन दुचाकी चालकाशी वादवादी झाली. यानंतर दुचाकीवरील संजय राजाराम साळुंखे आणि सुजीत सुनिल शिवदास (दोघे रा. बोरगाव) यांनी एसटी थांबवली. एसटी चालकाला खाली खेचत कमरेच्या पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.

या घटनेने एसटीमधील प्रवासी घाबरले. जिल्हा वाहतूकच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व सर्वांना पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी दोघांना अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आहे. फौजदर एस.बी. जाधव पुढील तपास करत आहेत.