Your Own Digital Platform

जिल्हा युवक कॉंग्रेसची भाजपाविरोधात निदर्शने


कराड : हे फडणवीस सरकार नसून फसणवीस सरकार असल्याची घणाघाती टीका करत बुधवारी सकाळी सातारा जिल्हा युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर कोल्हापूर नाका परिसरात "निषेधासन' हे अनोखे आंदोलन केले. केंद्र सरकारसह राज्य शासनाने गेल्या चार वर्षात जनतेची केवळ फसवणूक करत जाहिरातबाजी करत सर्वसामान्यांना लुटले आहे. त्यामुळे केंद्रासह राज्य शासनाला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा दावा करत पुढील वर्षीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव अटळ असल्याची घणाघाती टीका करत युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.

राज्य शासनाला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले. या आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव गणेश जगताप, जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, कराड उत्तर तालुकाध्यक्ष अमित जाधव, दक्षिण उपाध्यक्ष समीर पटवेकर, पाटण तालुकाध्यक्ष जगदीश पाटील, दादासोा काळे, अजित भोसले, जितेंद्र यादव, राहुल पवार, प्रसाद यादव, गोल्डन पवार, अजित केंजळे, विवेक चव्हाण, विक्रांत चव्हाण, संग्राम काळभोर, तारिक बागवान, किरण पाढरपट्टे यांच्यासह जिल्हा युवक कॉंगे्रसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.