Your Own Digital Platform

फलटण पालिकेचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांची तडकाफडकी बदली


फलटण : फलटण नगरपालीकेचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांची सोमवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. ते आता दुधणी जि. सोलापूर येथे रुजू होणार असून तेथीलच प्रसाद काटकर यांची फलटणच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.फलटण नगरपालिकेचा कारभार हातात घेतल्या पासून या ना त्या कारणाने सतत चर्चेत होते. धैर्यशील जाधव व नगरसेवक किंवा नगरसेविकांचे पती यांच्या बरोबर नेहमीच खटके उडत होते. अनेक वेळा जाधव भेटतच नसल्याचा आरोप नगरसेवक करत होते. 

माजी नगराध्यक्ष यांनी झाडे तोडली म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची ऐतिहासिक घटना घडली होती. यामुळे अनेक वेळा मासिक सभेत सत्ताधारी व विरोधक यांनी जाधव यांना धारेवर धरले होते. या बदलीमुळे त्यांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला. मात्र त्यांची बदली कोणत्या कारणातून झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.