रेठर्‍यातील पुलाजवळ अपघाताचा धोका


रेठरे बु : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे कृष्णा नदीवर दक्षिण, उत्तर असा साधारण चारशे मीटर लांबीचा पूल आहे. रेठरे बुद्रूकपासून रेठरे खुर्दकडे जात असताना पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे, झुडपेे वाढली आहेत. रेठरे खुर्दकडे जाताना मोठे वळण असल्याने चालकांसाठी हे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे यावर त्वरित उपाययोजना आवश्यक आहे.सातारा, सांगली जिल्ह्यांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक व रहद्दारी सुरू असते. रेठरे कारखाना तसेच शेणोली भागातून कोल्हापूरकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर होत असतो. 

या मार्गावर पुलाच्या दोन्ही बाजूला मोठया प्रमाणात झाडे, झुडपे वाढली आहेत. शिवाय रेठरे खुर्दकडे जाता धोकादायक वळण आहे. या वळणावर समोरून येणार वाहनच दिसत नाही. कारखाना सुरू झाल्यावर बैलगाडी, ट्रॅक्टर यामधून ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांची संख्या मोठी असते. समोरून येणारे वाहन न दिसल्याने याठिकाणी अनेक छोटे - मोठे अपघातही होतात. यापूर्वी काहींच्या अक्षरश: जीवावर बेतले आहे. त्यामुळे झाडे तोडण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. भविष्यात मोठा अपघात होण्याची वाट बांधकाम विभाग पाहतय का ? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. त्यांनी बांधकाम विभागावर संताप व्यक्त केला आहे.

कृष्णा पुलाशेजारी असलेल्या झुडपांंमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वास्तविक ही हद्द रेठरे खुर्द ग्रामपंचायतीची आहे. त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया रेठरे बुद्रूकचे उपसरपंच शिवाजी चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

No comments

Powered by Blogger.