लोणंद निरा रोडवर भीषण अपघात


लोणंद : लोणंद निरा रोडवर रेल्वे उड्डाणपूल लगत गणेश पोल जवळ सकाळी सव्वासहा वाजता दोन ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण जखमी झाले आहेत.

लोणंद निरा दरम्यान असलेल्या रेल्वे उड्डाणपूलाजवळ असलेल्या गणेश पोलच्या गेट समोर सकाळी सव्वा सहाच्या सुमारास लोणंदकडून निराकडे जाणारा ट्रक क्र. MH12-HD-4998 व निरा कडून लोणंदकडे येणारा ट्रक क्र. MP -09- HH - 6777 यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये दोन्ही ट्रकच्या समोरील बाजूचा चेंदामेंदा होऊन दोन्हीही चालक जागीच ठार झाले. तर दोन जण जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळाताच लोणंद पोलिस स्टेशन चे सपोनि गिरिश दिघावकर आणि सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. आत अडकलेल्या जखमींना बाहेर काढून उपचारासाठी लोणंद मधील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. अपघातात ठार झालेल्या चालकापैकी ट्रक क्र. MP -09- HH - 6777 च्या चालकाचे नाव आरिफ खान वय 21 असे आहे तर रफिक छुट्टन खान रा. उज्जैन आणि शाहरूख खान रा. रिचडी , उज्जैन असे दोन जण जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या MH12-HD-4998 या ट्रकच्या ठार झालेल्या चालकाचे नाव गोविंद लक्ष्मण वाल्हेकर वय 37 रा पुणे असे आहे.

अपघाताची तीव्रता इतकी भयंकर होती की त्यामुळे दोन्ही ट्रक एकमेकांत गुंतलेले होते. त्यांना क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून दोन्हीही चालकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. व शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

No comments

Powered by Blogger.