लोणंद नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा


लोणंद : नगराध्यक्षपदी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने पुरस्कृत केलेले सचिन शेळके तर उपनगराध्यक्षपदी भाजपच्या किरण पवार यांची निवड अत्यंत चुरशीच्या झालेल्या लोणंद नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज दाखल करण्यात आले होते .त्यापैकी काँग्रेसच्या पी. बी. हिंगमिरे यांनी गुरुवारीच माघार घेतली होती तर सचिन शेळके यांचे दोन अर्ज दाखल केले होते . 

त्यामुळे आज राष्ट्रीय काँग्रेसकडून सौ स्वातीताई भंडलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप आघाडीचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार नगरसेवक सचिन शेळके या दोघांचे अर्ज दाखल करण्यात आले होते .त्यामूळे आज झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत सचिन शेळके यांनी नऊ मते घेऊन बाजी मारली. तर काँग्रेसच्या उमेदवार स्वाती भंडलकर यांना सहा मते मिळाली. तसेच उपनगराध्यक्षपदासाठी भाजपकडून किरण पवार आणि राष्ट्रीय काँग्रेस कडून मेघा शेळके यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आले होते.

 यामध्ये किरण पवार हे नऊ मते घेऊन विजयी झाले तर मेघा शेळके यांना सहा मते मिळाली. पीठासीन अधिकारी म्हणून सुनिता राजापूरे चौगुले व नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजीत परदेशी यांनी कामकाज पाहिले. यावेळी सभागृहात नगराध्यक्षा स्नेहलता शेळके पाटील उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके पाटील, नगरसेवक योगेश क्षीरसागर, हणमंत शेळके ,राजेंद्र डोईफोडे, पुरुषोत्तम हिंगमिरे ,सचिन शेळके ,किरण पवार, शैलजा खरात, सौ स्वाती भंडलकर, सौ हेमलता कर्णवर, सौ कुसुम शिरतोडे, सौ मेघा शेळके, सौ दिपाली क्षीरसागर, सौ लिलाबाई जाधव, सौ कृष्णाबाई रासकर तसेच काँग्रेस पक्षाचे स्विकृत नगरसेवक अॅड बाळासाहेब बागवान , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्विकृत नगरसेवक सुभाषराव घाडगे हे उपस्थित होते. 

तर नगराध्यक्षा स्नेहलता शेळके पाटील यांना अवैध बांधकाम प्रकरणी अपात्र घोषित करण्यात आल्याने मतदान करता आले नाही. तर काॅग्रेसचे नगरसेवक विकास लुमा केदारी हे मतदानाला अनुपस्थित राहिले

No comments

Powered by Blogger.