शरद पवारांनी आणले पुण्यातून श्रीनिवास पाटील यांना सोबत


सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी पुण्यातून सातारा पर्यंत एकत्र प्रवास केला. सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन मित्रांचा हा प्रवास भुवया उंचावनारा आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवासाठी शरद पवार साताऱ्यात येणार होते. यावेळी पुण्यातून येताना आपल्या गाडीतून त्यांनी श्रीनिवास पाटील यांनाही सोबत आणले.

गेल्या आठवड्यात पवार सातारा दोऱ्यावर असताना, श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा लढविण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर साताऱ्याच्या राजकारनात बरीच उलथा पालथ झाली. खासदार उदयनराजे व आमदार यांच्यामध्ये ताणले गेलेले संबंध आणखी विकोपाला गेले, एकमेकांची उनीदुनी पवारांच्या दरबारात निघाली. या राजकिय खुनसीवर पवार यांनी समेट बैठक लावली आहे. पण त्या पूर्वीं एका मुलाखतीत पवार यांनी राजे मंडळींचा चिमटा काढला होता. यावेळी राजेपदाचे भान राखले नाही तर सामन्यांना यातना सहन कराव्या लागतात असे पवार यांनी सुनावले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर पवार पुन्हा सातारा येथे आले आणि येताना श्रीनिवास पाटील यांना घेऊन आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

No comments

Powered by Blogger.