एटीएममध्ये पैसे भरणार्‍यांनीचं मारला १ कोटी ४१ लाखांवर डल्‍ला


सातारा : बँकेतील एटीएममध्ये पैसे भरणार्‍या तिघांनी आपआपसात संगनमत करुन तब्बल 1 कोटी 41 लाख रूपयांची फसवणूक केल्‍याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या घटनेने बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली असून, संशयित सर्व सातारा तालुक्यातील आहेत. दरम्यान, एसबीआय, अक्सेस व बँक ऑफ महाराष्ट्र या तीन बँकाची ही रक्कम आहे.प्रमोद शिंदे (विसावा पार्क), विक्रम शिंदे (रा.अंगापूर वंदन), वैभव वाघमळे (कण्हेर सर्व ता.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अरविंद अण्णासो बनगे (वय 41, रा.वडणगे ता.करवीर, कोल्हापूर) यांनी तक्रार दिली आहे. ते सिक्युरिट्रन्स इंडिया प्रा.लि. कोल्हापूर या कंपनीचे मॅनेजर आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांची कंपनी असून, त्याद्वारे ते बँकेतील एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करते. या कंपनीअंतर्गत सातार्‍यातही काम चालत होते. संशयित तिघे हे या कंपनीच्या माध्यमातून कामाला होते. दि. 13 फेब्रुवारी 2017 ते 10 जुलै 2018 या कालावधीत संशयितांनी एटीएममध्ये पैसे न भरता अपहार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.