आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

पाटण तारळेतील चोरीप्रकरणी तिघा संशयितांकडे चौकशी


तारळे : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळे येथे दुकानांसह मोटारसायकल चोरीप्रकरणी तीन संशयित युवकांना तारळे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तिन्ही संशयित पाटण तालुक्यातील असून त्यातील दोघांचा चोरीत सहभाग असण्याची शक्यता आहे. तर एकाकडे कसून चौकशी सुरू असून चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.शुभम लिंगाळे व दिनेश कदम या दोघांसह अन्य एकावर शुक्रवारी रात्री तारळे - कोंजवडे या मार्गावर संशयास्पदरित्या वावरताना रात्रगस्त घालणाऱ्या पोलिसांना मिळून आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून तारळेसह परिसरात छोट्या - मोठ्या चोरींचे प्रमाण वाढले होते. त्यामुळेच पोलिसांनी संबंधितांकडे चौकशी केली असताना त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

संशयितांपैकी लिंगाळे व कदम यांचा एका दुकानातील चोरीत सहभाग असण्याची शक्यता समोर आली असून त्याबाबत पोलिस चौकशी करत आहेत. तर तिसऱ्या संशयितांचा मोटारसायकल चोरीत सहभागी असण्याची शक्यता असून त्याबाबत कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळेच पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वाढली असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.