आनेवाडी टोलनाक्यावर १२ लाखाचा गुटखा जप्त


ओझर्डे : पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एका कारमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी सकाळी ६ वाजता आनेवाडी टोलनाक्यावर पोलिसांनी सापळा रचून कार पकडली. यामध्ये तब्बल १२ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा बाजूकडून हवाई बाजूकडे ईरटीका कार (क्र एम. एच. 11 सी. जी 6793) गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या पथकातील हवलदार श्रीनिवास बिराजदार आणि ऊमेश लोखंडे यांना आनेवाडी टोल नाक्यावर सापळा लावण्याचे आदेश दिला होता.

बिराजदार आणि लोखंडे हे साध्या वेशात दबा धरुन बसले. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सातारा संबंधित कार आनेवाडी टोल नाक्यावर आली असता ती थांबवली. त्यात चालक मालक असलेले सतीश जयवंत पवार ( वय 42, रा. गंगापुरी, वाई) आणि विनायक पांडुरंग जाधव (वय 35, रा. कणुर) त्यांच्या गाडीची तपासणी केली असता १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.