कोल्हापूर नाका म्हणजे ‘मृत्यूचा जबडा’


कराड : कोल्हापूर नाका हा मृत्यूचा सापळा बनला असून यावर तातडीने आवश्यक त्या उपाय योजना करण्याची गरज आहे. महामार्गावरून शहरात येणारे रस्ते अपघाताला निमंत्रण देत आहेत. वाहतूक शाखेच्या पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असून येथे असलेल्या पोलिसांचे वाहतूकीला शिस्त लावण्याऐवजी सावज शोधण्याकडे जास्त लक्ष असल्याचे दिसून येते. कोल्हापूर नाक्यावर त्या मार्गावरून जाणारी बहुतेक वाहने थांबतात. एसटी, रिक्षा, खासगी प्रवाशी वाहने प्रवाशी घेण्यासाठी व उतरण्यासाठी त्या ठिकाणी थांबतात. पण तेथे थांबा नसल्याने हे सर्व प्रवाशी रस्त्याकडेला उन्हा, पावसात वाहनांची वाट पहात उभे असतात. त्या ठिकाणी थांबणारी वाहने व प्रवाशी रस्त्याच्या मध्यावर असतात. 

त्यामुळे पाठिमागून येणार्‍या वाहनांसाठी जागाच उतर नाही. परिणामी तेथे वाहतूक कोंडी होत असते. महामार्गाहून शहरात येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी त्या ठिकाणी दोन मार्ग आहेत. तिसरा मार्ग उड्डानपुलाच्या खालून चिंचोळ्या जागेतून जयवंत आर्केडकडे निघतो. हा मार्ग अत्यंत धोकादायक असून अनेक अपघात त्या ठिकाणी झाले आहेत. काहींना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्या ठिकाणी वाहतूक पोलिस नसल्याने महामार्ग ओलांडणार्‍या वाहनांवर व प्रवाशांवर कोणाचे नियंत्रण नसते. महामार्गावरून भरधाव जाणारी वाहने त्याच वेळी या चिंचोळ्या जागेतून महामार्ग ओलांडणारी वाहने त्यामुळे हा मार्ग मृत्यूचा जबडा बनला आहे.

No comments

Powered by Blogger.