आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

उदमांजराची शिकार; तिघांना अटक


वडूज : मायणी परिसरात कलेढोण-शिंदेवाडी रस्त्यालगत उदमांजराची शिकार करणार्‍या तिघांना वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. संशयित आरोपींना न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.ढवळू पांडुरंग जाधव, धनराज सुदाम महाले, गोविंद राजाराम जाधव (सर्व रा. नाशिक), अशी संशयित आरोपींची नावे आहेत. अवैध वृक्षतोड, अवैध शिकार याविरोधात सातारचे उपवनरमक्षक भारतसिंह हाडा यांच्या आदेशानुसार वनविभागाचे काही अधिकारी व कर्मचारी रात्र गस्त घालत होते. दरम्यान, कलेढोण-शिंदेवाडी रस्त्यावर संशयित रित्या तिघे आढळून आले. त्यांच्याकडे एक उदमांजर व शिकारीचे साहित्य मिळून आले. तिघांनाही वनविभागाच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेवून रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

वनपाल काश्मीर शिंदे, दादा लोखंडे, मोहन शिंदे, मोहन जाधव, दुर्योधन जाधव, संभाजी दहिफळे, सुहास काळे यांचा सहभाग आहे. यांच्याच पथकाने पुसेगाव परिसरात रात्रगस्त घालताना दोन लाख रुपये किमतीचे अवैध रित्या तोड केलेले खैर लाकूड पकडले आहे.