Your Own Digital Platform

वेण्णा लेक परिसरात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया


महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ही गळती मुख्य रस्त्यावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा वेण्णालेक पंपिंग स्टेशन पासून विल्सन पॉईंट येथे जाणाऱ्या पाईपलाईनला लागली आहे. 

त्यामुळे सुमारे तीस फुटांपर्यंत पाण्याचे कारंजे उडत होते.पाईपलाईन गळतीची माहिती मिळताच काहीकाळानंतर प्राधिकाऱ्यांचे कर्मचारी दाखल झल्यानंतर पाण्याची मुख्य लाईन बंद करण्यात आली. मात्र तोपर्यंत लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले होते. पाईप फुटल्याने पाण्याचे कारंजे इतक्या उंचीवर गेले होते की हे पाणी रस्त्यावरून जाणाऱ्या विजवाहक तारांना स्पर्श करत होते. याप्रकाराणे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.