प्रतापगडाच्या कडेलोट पॉईंटवरून महिलेची आत्महत्या


प्रतापगड : किल्ले प्रतापगडाच्या कडेलोड पॉईंटवरून महिलेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने प्रतापगड परिसरात खळबळ उडाली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गद्दारी करणार्‍याला अठराशे फूट खोल दरीत फेकुन देण्याची शिक्षा दिली जात होती. किल्ले प्रतापगड येथे पर्यटनासाठी येणारे पर्यटक या पॉईंटला भेट देतात. गुरुवारी सकाळी कडेलोट पॉईंटवरुन उडी घेऊन महिलेने आत्महत्या केली आहे.

या महिलेची चपल, पर्स घटनास्थळावरुन मिळून आली आहे. पर्समध्ये मतदान ओळखपत्र व आधार कार्ड मिळून आले आहे. संशयीत महिलेचे नाव ज्योती नवनीत बल्लाळ असे असून या महिलेसोबत एक इसम असल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी प्रतापगड पोलिस पोहचले असून महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.