एमआयडीसीत बीएसएनएलचा खेळखंडोबा


सातारा : सातारा एम. आय. डी. सी मधील बीएसएनलची इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात विविध कार्यालय, कंपन्या, बँका, पोस्ट ऑफीस यांना फटका बसला आहे. तर ग्राहकांना बीएसएनल कार्यालयात अधिकारी उर्मट उत्तरे देत असल्याने न्याय कोणाकडे मागावयाचा असा प्रश्‍न पडला आहे.

गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सातारा एम आय डी सी मधील बीएसएनलची इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे विविध कार्यालये, कंपन्या, बँका, पोस्ट ऑफीसमधील दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे. इंटरनेटविना काहीही कामकाज करता येत नाही. याबाबत अनेक ग्राहकांनी बीएसएनलच्या कार्यालयात धाव घेवून समस्यांचे गार्‍हाणे मांडले. मात्र, येथील अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांची कमतरता आहे असे कारण सांगितले. त्रस्त ग्राहकांनी कार्यालयात फोन केला तर अधिकारी ग्राहकांशी उर्मट उत्तरे देत आहेत. तुम्ही कार्यालयात फोन करू नका लाईनमनशी संपर्क साधा, असा सल्ला देत आहेत. त्यामुळे बीएसएनलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. एम.आय.डी.सी. पोस्टाला अन्य उपपोस्ट कार्यालये जोडली आहेत. मात्र, इंटरनेट सेवेअभावी सर्व व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प आहेत.

केंद्र शासनाने सर्व व्यवहार ऑनलेाईन करण्याचे आवाहन केले आहे. सणासुदीतच इंटरनेट सेवा ठप्प झाली असल्याने ऑनलाईन खरेदेी करणार्‍या ग्राहकांना फटका बसला आहे. विविध कंपन्या, सरकारी संस्थाचे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत बीएसएनलच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी त्वरीत दखल घेवून ठप्प झालेली इंटरनेट सेवा तत्काळ सुरू करावी अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.

No comments

Powered by Blogger.