आंबेनळी घाटात कार कोसळली


प्रतापगड : काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथील दापोली कृषी विद्यापीठाची सहल घेऊन जाणारी एक बस महाबळेश्वर - पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटातून खाली कोसळली होती. त्यामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी शनिवारी सकाळी एक बीएमडब्ल्यु कार ५० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये चालक जखमी झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, कार चालक प्रशांत राजेंद्र सोसटे (रा. भोसरी, पुणे) हे पोलादपूर बाजूकडून महाबळेश्वरला निघाले होते. 

शनिवारी सकाळी आंबेनळी घाटातील बावली टोक येथे गाडी आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी ५० फूट खोल दरीत कोसळली तर ससाटे हे गाडीतून बाहेर पडून झाडावर अडकून पडले. पाठीमागून येणाऱ्या एका गाडीतील चालकाने याची माहिती प्रतापगड येथील वाडा कुंभरोशी येथील ग्रामस्थ यांना दिली. त्यानंतर गावातील युवक आणि नागरिकांनी मदत कार्य राबवून त्यांना बाहेर काढले. त्यांना तेथीलच एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.